top of page

फॉरेन लँग्वेज ऑनलाइन अप्लिकेशन, कलारंग सांस्कृतिक कला संस्था व महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

|| माझ्या मराठीची बोलू कौतुके ||

मराठी राजभाषा दिवस ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धा

नियमावली

  • स्पर्धेची नोंदणी दिनांक 30 एप्रिल 2025 ला चालू होईल व दिनांक 15 मे 2025 पर्यंत चालू राहील.

  • स्पर्धा ऑनलाइन आहे व त्यासाठी स्पर्धकांनी नमूद केलेल्या कालावधीत आपल्या वक्तृत्वाचा विडिओ बनवून आपल्या पालकांच्या सहाय्याने युट्यूब चॅनल अथवा सोशल मीडिया अकाऊंट वर अपलोड करावा.

  • विडिओ बनवताना मोबाईल अथवा कॅमेरा अडवा धरून शूट करावा तसेच शांत ठिकाणी विडिओ बनवावा जेणेकरून वक्तृत्व नीट ऐकू येईल. विडिओ मध्ये स्पर्धक सोडून इतर कोणी दिसू नये तसेच इतर कोणाचा आवाज सुद्धा येवू नये. स्पर्धकाला कुठल्याही प्रकारे मदत करू नये व संपूर्ण विडिओ एकसंध असावा. तुकड्या तुकड्यात शूट करून एडिट करू नये.

  • स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. तिथे रजिस्ट्रेशन फॉर्म दिसेल.

  • फॉर्म भरताना आपले नाव ईमेल आयडी आणि संपर्क क्रमांक व्यवस्थित भरावे. त्याखाली आपली जन्मतारीख भरावी. जन्मतारीख भरल्यावर खाली अधिक माहिती विचारली जाईल. त्यात आपला आधार क्रमांक, राज्य, जिल्हा, संस्थेचे व शाळेचे नाव, इयत्ता, शाळेचा बोर्ड, शाळेचे भाषा माध्यम, इत्यादी निवडावे. त्यानंतर खाली Certification Authority च्या dropdown मध्ये FLOA Activities वर क्लिक करावे. खाली Courses / Activities च्या dropdown ला क्लिक केल्यावर "मराठी भाषा वक्तृत्व स्पर्धा" निवडावी व Select Exam Date मध्ये ३० एप्रिल ते १५ मे हा कालावधी निवडावा.

  • खाली Exam Fee मध्ये वक्तृत्व स्पर्धेचे शुल्क आपल्याला दिसेल.

  • फॉर्म भरून Register वर क्लिक करावे. क्लिक केल्यावर आपल्याला स्पर्धेची फी भरण्याची लिंक प्राप्त होईल. Pay Exam Fees वर क्लिक केल्यावर स्पर्धेच्या फी ची रक्कम भरावी. ही रक्कम तुम्ही UPI, Debit/Credit Card, Netbanking अथवा Wallet द्वारे भरू शकता.

  • ​रक्कम भरल्यावर floa.education ह्या वेबसाइट वर redirect होईल आणि तुम्ही भरलेल्या इमेल आयडी वर तुम्हाला एक मेल प्राप्त होईल ज्यामध्ये तुमची संपूर्ण माहिती व सोबत Login करण्यासाठी Login Id आणि Login Password प्राप्त होईल.

  • वरील Login लिंक वर क्लिक करून प्राप्त Login Id आणि password वापरून login करावे. Login केल्यावर डाव्या बाजूला Competition बटन वर क्लिक करावे. तिथे दिलेल्या स्पेस मध्ये आपण अपलोड केलेल्या विडिओ ची लिंक पेस्ट करावी आणि Submit म्हणावे.

  • जर तुम्ही आधीपासुन FLOA चे नोंदणीकृत विद्यार्थी असाल तर स्पर्धेत भाग घेण्यासाठी आपल्या लॉगीन द्वारे फक्त स्पर्धा शुल्क भरून भाग घेऊ शकता. त्याकरिता संपूर्ण फॉर्म पुन्हा भरणे गरजेचे नाही. स्पर्धेचा विडिओ अपलोड करण्याची प्रक्रिया वरील प्रमाणेच राहील.

  • स्पर्धेचे परिक्षण करताना विषयाची संलग्नता, उच्चारण, आवाज, सादरीकरण, आत्मविश्वास इत्यादी बाबी विचारात घेतल्या जातील. स्पर्धकांनी कुठल्याही प्रकारचा गणवेश अथवा वेशभूषा करू नये.

  • वक्तृत्व संपूर्णतः मराठी भाषेत असावे व इतर भाषांमधले शब्द वापरणे टाळावे.

3.png
bottom of page